Psalms 122

1आपण परमेश्वराच्या घराला जाऊ असे ते मला म्हणाले,
तेव्हा मला आनंद झाला.
2हे यरुशलेमे,
तुझ्या द्वारात आमची पावले लागली आहेत.
3हे यरुशलेमे,
एकत्र जोडलेल्या नगरीसारखी तू बांधलेली आहेस.

4इस्राएलासाठीच्या नियमाप्रमाणे,

तुझ्याकडे वंश, परमेश्वराचे वंश,
परमेश्वराच्या नांवाचे उपकारस्मरण करण्यासाठी वर चढून येतात.
5कारण तेथे न्यायासने,
दावीदाच्या घराण्यासाठी राजासने मांडली आहेत.

6यरुशलेमाच्या शांतीसाठी प्रार्थना करा!

तुझ्यावर प्रीती करतात त्यांची भरभराट होईल.
7तुझ्या कोटात शांती असो
आणि तुझ्या राजवाड्यात उन्नती असो.

8माझे बंधू आणि माझे सहकारी ह्यांच्याकरता,

मी आता म्हणेल, तुमच्यामध्ये शांती असो.
परमेश्वर आमचा देव ह्याच्या घराकरता,
मी तुझ्या हितासाठी प्रार्थना करीन.
9

Copyright information for MarULB